बाल आनंद मेळावा खटाव केंद्र समूह

          

        बाल आनंद मेळावा , केंद्रसमूह - खटाव
                    दिनांक २० फेब्रुवारी २०२०
              स्थळ - मोरया मंगल कार्यालय, खटाव  

                    आज दि.२० फेब्रुवारी २०२० रोजी खटाव केंद्र समूहाचा बालआनंद मेळावा 'मोरया मंगल कार्यालय, खटाव 'येथे आयोजित करण्यात आला होता. आजच्या बाल आनंद मेळाव्यात माझ्या जि.प.शाळा - पवारवाडी(दरूज) ता.खटाव जि.सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी 'खरी कमाई 'हा भेळेचा stall लावला होता. १० रुपयात रुचकर भेळ मिळत असल्याने खवय्यांनी खूप गर्दी केली होती. 

खटाव पंचायत समितीच्या सभापती मा.सौ. रेखाताई घार्गे , खटाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.पिसे साहेब ,खटाव केंद्र समूहाच्या केंद्रप्रमुख मा.सौ.पवार madam , तसेच वर्धनगड केंद्रसमूहाचे केंद्र प्रमुख मा.श्री.जगदाळे साहेब यांनी स्टोलला भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सहभागी  विद्यार्थ्यांना  शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ.संगीता सजगणे madam व उपशिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन केले.