[21/11, 16:25] Dhananjay Kulkarni: http://www.frontpage.ind.in/sharenews.aspx?q=260922
[21/11, 16:25] Dhananjay Kulkarni: शिक्षणाधिकारी सौ.कोळेकर यांना "तंत्रस्नेही शिक्षक" पुस्तक भेट
प्रकाशन दि.: २१ नोव्हें. २०, दु. १२:०४ वा
पुसेसावळी :
शिक्षणाधिकारी मा. सौ. प्रभावती कोळेकर यांना 'सकाळ' प्रकाशनाचे श्री. सुनील शेडगे लिखित "तंत्रस्नेही शिक्षक" या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. याप्रसंगी पुस्तकात उल्लेख असलेले तंत्रस्नेही शिक्षक श्री. संतोष लोहार, श्री.नंदकुमार केंजळे, श्री.धनंजय कुलकर्णी, सौ. सविता बारंगळे व श्रीम. ज्योती कदम हे उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी मा. सौ. कोळेकर प्रभावती यांनी 'तंत्रस्नेही शिक्षक' पुस्तकात उल्लेख असलेल्या सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचे व लेखक श्री.सुनील शेडगे यांचे विशेष अभिनंदन केले. तंत्रस्नेही शिक्षकांच्या प्रयत्नामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्या सुरू असलेल्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृतिपत्रिका बनविण्यात सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.
जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या विद्यमाने शाळा बंद पण शिक्षण सुरू अभ्यासमाला online टेस्टनिर्मितीत सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविणार असल्याचे सांगितले. 'तंत्रस्नेही शिक्षक' पुस्तकात उल्लेख असलेल्या शिक्षकांनी एकत्र येऊन प्राथमिक शिक्षण विभागाचे एखादे वेब पोर्टल तयार करून शिक्षण समृद्धीसाठी सुरू असणाऱ्या सर्व उपक्रमांची, प्रयत्नांची माहिती त्यात सर्व शिक्षकांना देता यावी यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सुचविले. सोबत vertual field trip, तंत्रस्नेही प्रशिक्षण, अध्ययन निष्पत्तीवर आधारित स्वाध्याय यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली. एकंदरीत एक तासभर झालेल्या चर्चेत शिक्षणाधिकारी मा. प्रभावती कोळेकर मॅडम यांनी सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांची तंत्रस्नेही शिक्षकांप्रती असणारी प्रेरणा, प्रोत्साहन व मार्गदर्शन यामुळे सातारा जिल्ह्यात तंत्रस्नेही चळवळीतून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
टॅग्स :
No comments:
Post a Comment