26 नोव्हेंबर संविधान दिवस

 *आपले भारतीय संविधान*📘📕📗📘📕📗📓

*२६ नोव्हेंबर- संविधान दिन*


*(१)भारतीय सविधान म्हणजे काय  ?*


--  आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी तयार 

 करण्यात आलेले नियम ज्या पुस्तकात एकत्रित 

 आहेत, त्यास  'भारताचे संविधान 'असे म्हणतात. 

------------------------------------------------

*(२) 'सविधान सभा ' कशास म्हणतात  ?*


-- आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी 

 जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या 

  समितीला संविधान सभा ' असे म्हणतात. 

------------------------------------------------

*(३) भारतीय संविधानात नागरिकांसाठी* 

     *कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत  ?*


--  भारतीय संविधानात नागरिकांसाठी हक्क 

     व कर्तव्य नमूद केलेले आहेत. 

------------------------------------------------

*(४)भारतीय संविधान का निर्माण करण्यात*

    *आले  ?*


--- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी 

संविधान निर्माण करण्यात आले आहे.  

राज्यकारभार करताना लोकप्रतिनिधी 

संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही.  संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्यही सांगितली 

असल्याने नागरिकांनाही संविधानाचा उपयोग होतो. 

------------------------------------------------

*(५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय*

      *संविधानाचे शिल्पकार म्हणतात.*


---  संविधानातील  नियमांचा मसुदा तयार 

करण्यासाठी एक मसुदा समिती नेमण्यात आली. 

या समितीचे अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 

होते. त्यांनी संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे 

मोलाचे कार्य केले.  म्हणून डाॅ. बाबासाहेब यांना 

भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. 

------------------------------------------------

*(६) संविधान सभेने संविधानाचा स्वीकार*

    *कधी केला ?*


---  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हे  संविधान स्वीकारले. 

------------------------------------------------

*(७) भारतीय संविधानाची अंमलबजावणी  सुरू कधी  करण्यात आली  ?*


-- आपल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० या दिवसापासून सुरू करण्यात आली. 

==========================

              *संकलन*

 *श्री धनंजय अ. कुलकर्णी*    

  जि. प. प्रा. शाळा - पवारवाडी

    केंद्र -खटाव ता. खटाव

    जि. सातारा

     📞 9922638598

              ही पोस्ट माझ्या 

http://pradnyadhan.blogspot.com

 या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.

No comments:

Post a Comment