गोष्टींचा शनिवार ८ वा आठवडा

 [26/12, 07:54] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 26*

*इयत्ता:* 3 & 4

*थीम :* लढवा कल्पना!

*पुस्तकाचे नाव:* आज मी झाले आहे...

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/2ItaUyv

*ऍक्टिव्हिटी :*      

आरोग्य, मनोरंजन, शिक्षण, तंत्रज्ञान संगीत, समाज माध्यमे, संशोधन  अशा क्षेत्रातले  तुम्हाला माहीत असलेले व्यवसाय किंवा नोकऱ्या  सांगा. यापैकी तुम्हाला कोण व्हायला आवडेल? त्यातला सर्वात आकर्षक भाग कोणता? हे सर्व लिहून पाठवा. किंवा बोला आणि त्याचा व्हिडिओ पाठवा. 


शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[26/12, 07:54] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 26*

*इयत्ता:* 1 & 2

*थीम :* चला निसर्गात!

*पुस्तकाचे नाव:* कोण बरं स्वच्छ करतंय सारं?

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/36Zs4xq

*ऍक्टिव्हिटी :*         

अन्न-साखळीचे चित्र काढा. कोणते प्राणी काय खातात ते आकृतीत दाखवून तिथे नाव लिहा. या आकृतीचा फोटो काढून पाठवा.


शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[26/12, 07:54] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 26*

*इयत्ता:* 5 & 6

*थीम :* वाचनाचा आनंद 

*पुस्तकाचे नाव:* वेटलिफ्टिंग करणारी राजकुमारी

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3m7TxRT

*ऍक्टिव्हिटी :*     

जर तुम्हाला वर्गात किंवा घरी मित्रांसाठी एखाद्या  गमतीदार स्पर्धेचे आयोजन करायला सांगितले तर ती कोणती स्पर्धा असेल?  परीक्षक म्हणून तुम्ही कोणाला बोलवाल? प्रत्येक मुलाला भाग घेऊन आपले कौशल्य दाखवता येईल अशी एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी शिक्षक किंवा पालक यांनी मदत करावी. त्याचा व्हिडिओ पाठवावा. 


शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

सामान्य ज्ञान प्रश्नावली

 *सामान्यज्ञान प्रश्नावली*

          *D.K's Blog*

   

⚀⚅⚃⚀⚃⚄⚅⚀ ⚃

http://pradnyadhan.blogspot.com/ 

*१) भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणते ?*


*उत्तर -- भारतरत्न*

--------------------------------------------------------

*२) भारताचा सर्वोच्च शौर्य पदक कोणते ?*


*उत्तर -- परमवीर चक्र* --------------------------------------------------------

*३) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणते ?*


*उत्तर -- ज्ञानपीठ पुरस्कार* 

--------------------------------------------------------

*४) भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणते ?*


*उत्तर -- दादासाहेब फाळके पुरस्कार* 

--------------------------------------------------------

*५) भारताच्या नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ?*


*उत्तर -- नरेंद्र मोदी (पंतप्रधान)*

--------------------------------------------------------


*६) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होते ?*


*उत्तर -- इंदिरा गांधी*

--------------------------------------------------------

*७) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?*


*उत्तर -- प्रतिभाताई पाटील* 

--------------------------------------------------------

*८) भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण ?*


*उत्तर -- सरोजनी नायडू* 

--------------------------------------------------------

*९) भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?*


*उत्तर -- सुचेता कृपलानी ( उत्तर प्रदेश)*

--------------------------------------------------------

*१०) भारतातील सर्वांत मोठे राज्य (क्षेत्रफळाने) कोणते ?*


*उत्तर -- राजस्थान* --------------------------------------------------------

*११) भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळाने) कोणते ?*


*उत्तर -- गोवा* 

--------------------------------------------------------

*१२) भारतातील सर्वात मोठी चर्च कोणती ?*


*उत्तर -- से कॅथेड्रल ( गोवा )*

====================    

 *माझ्या*http://pradnyadhan.blogspot.com/

 *ब्लाॅगवर ' सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*

👇

http://pradnyadhan.blogspot.com/

  

राष्ट्रीय गणित दिन

 *श्रीनिवास रामानुजन*


*प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ*


*जन्मदिन - २२ डिसेंबर , १९२०*


श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.

रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

जन्म व संशोधन

या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

मृत्यु

१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.





Google Docs use

 📩📩📩📩📩📩📩  

   *D.K's educhannel*

               *निर्मित*

*Google Docs चा प्रभावी  वापर कसा करावा?*

🔗🔗🔗🔗🔗🔗🔗

video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://youtu.be/dXyz2poBB00


*please Like , share and Subscribe my youtube channel.*

https://youtube.com/c/DKsEduchannel

⏳⏳⏳⏰⏳⏳⏳

राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन २०२०

 🥇🥈🥉🏅🥇🥈🥉,🥈🥇🏅🥉

*मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी , मुंबई*आयोजित

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन - २०२०*

              मुंबई येथे दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी संपन्न झालेल्या *राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन २०२०* मध्ये माझ्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मला *राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार* देवून गौरवण्यात आले. त्याबद्दल मी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी , मुंबई यांचा ऋणी आहे.

          *धन्यवाद ! !,*

🎖️🎖️🎖️🙏🎖️🎖️🎖️🥉🏅🥇🙏🥈🥇🥉






गणितातील महत्वाची सूत्रे

 ⚛️ गणित ⚛️


✅गणितातील महत्वाची सूत्रे


वर्तुळ -


1.     त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. 


2.     वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात. 


3.     वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो. 


4.     जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.


5.     व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय. 


6.     वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो. 


7.     वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो. 


8.     वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D 


9.     अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7 


10.  अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36 


11.  वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)


12.  वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   


13.  वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30 


14.  अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2 


15.  अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36 


16.  दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर. 


17.  दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते. 


घनफळ -


1.     इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)


2.     काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची 


3.     गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)


4.     गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2     


5.     घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3


6.     घनचितीची बाजू = ∛घनफळ


7.     घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. 


8.     घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 


9.     वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h 


10.  वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 


11.  वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h 


इतर भौमितिक सूत्रे -


1.     समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची 


2.     समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार 


3.     सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2


4.     वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2


5.     वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr


6.     घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2


7.     दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh 


8.     अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2


9.     अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3


10.  त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )


11.  शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  


12.  समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2


13.  दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) 


14.  अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 


15.  (S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  


16.  वक्रपृष्ठ = πrl


17.  शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी 


बहुभुजाकृती -


1.     n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.


2.     सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.


3.     बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते. 


4.     n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते. 


5.     सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप 


6.     बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2 


उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9


 


तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -


1.     1 तास = 60 मिनिटे     


2.     0.1 तास = 6 मिनिटे   


3.     0.01 तास = 0.6 मिनिटे


4.     1 तास = 3600 सेकंद     


5.     0.01 तास = 36 सेकंद   


6.     1 मिनिट = 60 सेकंद     


7.     0.1 मिनिट = 6 सेकंद 


8.     1 दिवस = 24 तास


              = 24 × 60


              =1440 मिनिटे  


              = 1440 × 60


              = 86400 सेकंद


 


घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -


1.     घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते. 


2.     दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो. 


3.     दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.


4.     तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात. 


 दशमान परिमाणे -


विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.


1.     100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल 


2.     10 क्विंटल = 1 टन  

   


3.     1 टन = 1000 कि.ग्रॅ. 


4.     1000 घनसेंमी = 1 लिटर  


5.     1 क्युसेक=1000घन लि.   


6.     12 वस्तू = 1 डझन  

   


7.     12 डझन = 1 ग्रोस   

     


8.     24 कागद = 1 दस्ता 


9.     20 दस्ते = 1 रीम   

 


10.  1 रीम = 480 कागद. 


विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -


अ) अंतर –


1.     1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.


2.     1 से.मी. = 0.394 इंच 


3.     1 फुट = 30.5 सेमी.  


4.     1 मी = 3.25 फुट


5.     1 यार्ड = 0.194 मी.

           


6.     1 मी = 1.09 यार्ड


ब) क्षेत्रफळ -    


1.     1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2


2.     1 सेमी 2 = 0.155 इंच 2


3.     1 एकर = 0.405 हेक्टर


4.     1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे


5.     1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2


6.     1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल 


7.     1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल


8.     1 गॅलन = 4.55 लिटर 


क) शक्ती -    


1.     1 एच.पी. = 0.746 किलो वॅट


2.     1 किलो वॅट = 1.34 एच.पी. 


3.     ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2


4.     1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3 


5.     क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3


6.     1 मी 3 = 35 फुट 3 


7.     1 यार्ड 3 = 0.765 मी. 3 


इ) वजन -    


1.     1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0


2.     1 पौंड (lb) = 454 ग्रॅम


3.     1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb) 


वय व संख्या -


1.     दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2


2.     लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2


3.     वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो. 


दिनदर्शिका –


·         एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस 


·         महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. 


·         टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात. 


नाणी -


1.     एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज 


2.     एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1 


पदावली -


·         पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)


·         किंवा BODMAS हा क्रम ठेवावा.


सरासरी :-


1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या


 


2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.


उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14


 


संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी


 


n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2


 


उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13


 


2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10


 


3) N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2


 


उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81x20/2 = 810


 


(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20) 


 


 सरळव्याज :-


·         सरळव्याज (I) = P×R×N/100


·         मुद्दल (P) = I×100/R×N


·         व्याजदर (R) = I×100/P×N


·         मुदत वर्षे (N) = I×100/P×R


·         चक्रवाढव्याज  रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे  


 नफा तोटा :-


·         नफा = विक्री – खरेदी    

 


·         विक्री = खरेदी + नफा     


·         खरेदी = विक्री + तोटा 


·         तोटा = खरेदी – विक्री    

 


·         विक्री = खरेदी – तोटा   

 


·         खरेदी = विक्री – नफा 


·         शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 


·         शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 


·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 


·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 


·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)


·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)  


 आयात, चौरस, त्रिकोण, कोन :-


·         आयत -

आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)   

    


·         आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी 


·         आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी    

 


·         आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी 


·         आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.


·         आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 


·         चौरस -


·         चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी     


·         चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2 


·         चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 


·         दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.


   समभुज चौकोण -


·         समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ     


·         = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2 


·         समलंब चौकोण -


·         समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2 


·         समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज 


·         समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर 


·         त्रिकोण -


·         त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2


·         काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ    

 


·          


·         = काटकोन करणार्‍या बाजूंचा गुणाकार/2


·          


·         पायथागोरस सिद्धांत -


·         काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2 


 प्रमाण भागिदारी :-


·         नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर 


·         भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर 


·         मुदतीचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर 


 गाडीचा वेग – वेळ – अंतर :-


A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 


B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5 


C) गाडीचा ताशी वेग  = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ  × 18/5


 


D) गाडीची लांबी  = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18


 


E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18


 


F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.



1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर  = 3600/1000 = 18/5


 


G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2


 


H) गाडीने कापावायचे एकूण अंतर – गाडीची लांबी = बोगध्याची लांबी


 


I) भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ


 


= वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक


 


लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 🔖  *माझी बातमी ।। व्हाट्सअप मॅगझीन*


💁‍♂️  *महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश - पहा सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा ?*


⏰   राज्यात 2 सप्टेंबर पासून शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आली , मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय खर्चामध्ये कोरोनाचा समावेश नव्हता 


📃  दरम्यान आता १७ डिसेंबरला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश करण्यात आला आहे - याविषयीची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे 


💁‍♂️ *हे आपण व्यवस्थित समजून घेऊ*


🔰  तसे तुम्हला माहिती असेल शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते


🔰  तर याआधी राज्य शासनाने मार्च 2005 मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजार निश्चित केले आहेत - आता या १७ डिसेंबरला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश करण्यात आला आहे 


🔰  काल जाहीर झालेला हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे - आता या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे


📌 *राज्य सरकारने १७ डिसेंबरला* - घेतलेला निर्णय हा खरोखर खूप महत्वाचा आहे , आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा 


🙏  *सहकार्य करा - इतरांना पण शेअर करा*

गोष्टींचा शनिवार १९ डिसेंबर २०२०

 [18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*

*इयत्ता:* 1 & 2

*थीम :* चला निसर्गात!

*पुस्तकाचे नाव:* कामसू मुंग्या

*पुस्तकाची लिंक:*  https://bit.ly/3lVpYCV

*ऍक्टिव्हिटी :*         

रंगात बोटं बुडवून कागदावर मुंग्यांचं चित्रं काढा. एखादा मोठा चार्ट पेपर घ्यायचा. काळ्या रंगात बोटं बुडवून मुलांनी मुंग्यांची रांग काढायची आणि नंतर त्यांना पाय, डोळे काढायचे. शिवाय मुग्यांना खायला काय आवडतं याची यादी तयार करा. ही यादी  छोटी होईल की मोठी ? 


शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*

*इयत्ता:* 3 & 4

*थीम :* लढवा कल्पना!

*पुस्तकाचे नाव:* मीरा आणि अमीरा

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/370lpTi

*ऍक्टिव्हिटी :*      

हस्तकला - मुलांनी साबण किंवा चपातीच्या पिठाचा गोळा आणि काड्यापेटीतल्या काड्या घेऊन साळींदर हा प्राणी बनवायचा आहे. त्याला डोळे, तोंड काढून त्याची पिसं किंवा काटे मुलांना रंगवायला सांगा. 


शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*

*इयत्ता:* 5 & 6

*थीम :* वाचनाचा आनंद 

*पुस्तकाचे नाव:* आजीची भन्नाट शोधमोहीम

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3mZDI0P

*ऍक्टिव्हिटी :*     


गुप्तहेराचं काय काम असतं? तुम्हाला एखादा प्रसिद्ध गुप्तहेर माहित आहे का? 


*किंवा*

 

गुप्तहेर स्मरण खेळ: टेबलावरती शिक्षकांनी नेहमीच्या  काही वस्तू पसरून ठेवाव्या.(पेन्सिल, विविध पुस्तके, खोडरबर, खडूचे तुकडे, बॉक्स, दोरा , बिस्कीट, दगड, पानांची डहाळी असं काहीही). या सगळ्या  वस्तूंवर पांघरूण टाकायचं म्हणजे त्या वस्तू दिसणार नाहीत. मग ३० सेकंद ते काढून तेवढा वेळ मुलांना त्या वस्तू बघू द्याव्यात. मग पुन्हा झाकाव्या. आता मुलांना कागद आणि पेन्सिल द्या. दोन मिनिटात त्यांना आठवतील तेवढ्या वस्तूंची नावं त्यांनी कागदावर लिहायची. ज्याला सर्वात जास्त नावं आठवतील तो जिंकला.


शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*

*इयत्ता:* 7 & 8

*थीम :*  दुसऱ्या प्रदेशातल्या गोष्टी 

*पुस्तकाचे नाव:* तीन रडे

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3gra4it

*ऍक्टिव्हिटी :*      

     

हस्तकला:   पुस्तकातील १२ ते १४ या पानांवरची  माहिती वाचून कागदाचा कंदील  तयार करा.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

Today's video

 *Today's new video*

 ✡✡✡⍟✡✡✡

              🅓.🅚'🅢.    🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

     *Google Drive चा प्रभावी वापर कसा करावा ?*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/Q4HM2rrH8Wc

◆━━━▣✦▣━━━◆

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

please , please ...

*subsribe My youtube channel.*(यापूर्वी subscribe केले नसल्यास)

https://www.youtube.com/c/DKsEduchannel

◆━━━▣✦▣━━━◆

  *Please visit my blog*

http://Pradnyadhan.blogspot.com        

━━━━▣✦▣━━━━

*Join my telegram channel* 

by following link

https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA

━━━━▣✦▣━━━━

*Please visit my facebook page*

 by following link.

https://www.facebook.com/Dhanukulkarni76/

  ━━━━▣✦▣━━━━

DK सराव पेपर

 🥇🥈🥉💯🥇🥈🥉

    *D.k's.Blog निर्मित*

*शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी)*

     *सराव प्रश्नपत्रिका*

─━━━⊱✿⊰━━━─

*आपल्यापाल्याला,विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी करण्यासाठी ६००० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश.* pradnyadhan.blogspot.com या माझ्या ब्लॉगला भेट द्या.

प्रश्नपत्रिका *डाऊनलोड* करून *प्रिंट* काढा व सराव घ्या.

════◄••❀••►═══

*मराठी व गणित सराव पेपरसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_2.html

════◄••❀••►═══

*इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव पेपरसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_49.html

════◄••❀••►═══

*मुख्य परीक्षा पेपर (फेब्रुवारी 2017 ते फेब्रुवारी 2020) साठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_80.html

════◄••❀••►═══

       *निर्मिती व संकलन*

*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*

   उपशिक्षक शाळा पवारवाडी

   ता. खटाव, जि. सातारा

  *मो.9922638598*

🔰🔰🔰💯🔰🔰🔰

गोष्टींचा शनिवार दि.५ डिसेंबर २०२०

 [04/12, 16:09] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 5*


*इयत्ता: 3 & 4*

*थीम* : चला, खळखळून हसू!

*पुस्तकाचे नाव*: वाघेंडा, गेंडास्वल आणि अस्वाघ

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3qeHt4k

*ऍक्टिव्हिटी* :      


या गोष्टीतल्यासारख्या  एकमेकात मिसळलेल्या आणखी कोणत्या प्राण्यांची  कल्पना तुम्ही करू शकाल? तो प्राणी कसा दिसेल? कसा आवाज काढेल? तो कसा चालेल? काय खाईल? त्याचं चित्र काढून त्याला नाव द्या. 


किंवा


गटाने करण्यासाठी -   प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही एका प्राण्याचे चित्र कागदावर काढायला सांगा. नंतर दोघा -दोघांच्या जोड्या करा. नंतर त्या दोघांनी काढलेल्या चित्रांचे कागद दुमडून अशा पद्धतीने धरा की त्यातून एक नवाच प्राणी तयार होईल. उदाहरणार्थ, वरचा अर्धा भाग एका प्राण्याचा आणि खालचा अर्धा भाग दुसऱ्या प्राण्याचा. या नव्या प्राण्याला काय नाव द्याल?


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[04/12, 16:09] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 5*


*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : रंग, माप आणि आकार

*पुस्तकाचे नाव*: रस्त्यातले रंग...

*पुस्तकाची लिंक*:  https://bit.ly/39v43Qc

*ऍक्टिव्हिटी* :         


तुमच्या घराच्या आसपास कोणते प्राणी राहतात? त्यातल्या कोणत्याही पाच प्राण्यांची नावे सांगा. 


किंवा


गटाने करण्यासाठी - मुलांचे दोन गट करा. एखादा रंग सांगून त्याच  रंगातल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी त्यांना ओळखायला सांगा. ज्यांना जास्त संख्येने गोष्टी किंवा वस्तू ओळखता आल्या, तो गट जिंकला.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[04/12, 16:09] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 5*


*इयत्ता: 5 & 6*

*थीम* : विज्ञान आणि तंत्रज्ञान 

*पुस्तकाचे नाव*: आळशी मामा

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/39wmVhY

*ऍक्टिव्हिटी* :     

      

तुम्ही एखादा थ्रीडी सिनेमा बघितला आहे का?  कोणता  वेगळेपणा त्यात असतो?

व्हर्च्युअल रियालिटी किंवा आभासी वास्तव दाखवणारा चष्मा घालून कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील? उदाहरणार्थ  अंतराळयान उडवण्याचा अनुभव. तुम्हाला त्यावेळी काय वाटेल  याचं स्वतःच्या शब्दात वर्णन करा.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[04/12, 16:09] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 5*


*इयत्ता: 7 & 8*

*थीम* :  विज्ञान आणि तंत्रज्ञान 

*पुस्तकाचे नाव*: सापळ्याचं कोडं

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/37paLEK

*ऍक्टिव्हिटी* :      

     

मानवी शरीराविषयी कोणत्या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत? कोणत्याही पाच लिहा.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

Global teacher Ranjitsinh Disle.

 *गल्ली ते ग्लोबल असा आहे डिसले गुरुजींचा  थक्क करणारा प्रवास* 


करकंब (सोलापूर) : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षकाच्या नावाची घोषणा अभिनेते स्टीफन फ्राय यांनी केली आणि अतिशय सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील या मराठमोळ्या शिक्षकाने आपल्या आई-वडिलांना मिठीच मारली.


फक्त सोलापूर जिल्हाच नाही तर महाराष्ट्र राज्य आणि भारत देशाचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावणाऱ्या डिसले गुरुजींचा इथंपर्यंतचा प्रवासही तितकाच खडतर आहे; नव्हे नव्हे शून्यातून जग निर्माण करणे काय असते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डिसले गुरुजी. जनावरांच्या गोठ्याला विद्येचे मंदिर बनविताना त्यांनी फक्त विद्यार्थीच घडविले असे नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या क्रांतिकारक बदलांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील शिक्षणतज्ज्ञांना घेणे भाग पडले.

त्यांच्या या अतिशय खडतर पण आश्वासक वाटचालीविषयी आणि त्यांच्या अभिनव उपक्रमांविषयी...


बार्शी तालुक्‍यातील साकत हे एक छोटेसे गाव. याच गावातील रणजितसिंह डिसले नावाचा एक युवक 2009 साली माढा तालुक्‍यातील परितेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाला. नोकरी मिळाल्याच्या आनंदात हा नवनियुक्त गुरुजी शाळेवर हजर होण्यासाठी गेला खरा, पण शाळेची अवस्था पाहून काही क्षणात त्याचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला. कारण, उद्याच्या भारताची पिढी घडविताना विद्यार्थीरूपी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या रणजितसिंह डिसले यांनी पडझड झालेल्या शाळेच्या वर्गखोलीत अक्षरशः शेळ्या बांधलेल्या पाहिल्या.


या अवस्थेतही त्यांनी स्वतःला लगेच सावरले आणि प्राप्त परिस्थितीतही झोकून देऊन काम करण्याचा निश्‍चय केला. आपल्या मुलांनी शाळेत गेले पाहिजे आणि शिक्षण घेऊन उत्तम नागरिक बनावे, या विचाराचा तेथील पालकांमध्ये लवलेशही नव्हता. म्हणून त्यांनी प्रथम पालकांचे प्रबोधन केले. पण तरीही मुले शेतातील कामावर, गुरांच्या मागेच जात असत. तेव्हा रणजितसिंह डिसले यांनी मुलांना घरी जाऊन तर कधी वेळप्रसंगी अगदी शेतामध्ये जाऊनही गाडीवर बसवून शाळेत आणले. पण मुलांना शाळेत आनंद वाटला पाहिजे म्हणून पहिले सहा महिने त्यांनी पुस्तकाला साधा हातही लावला नाही. आपल्या मोबाईल व लॅपटॉपच्या साह्याने त्यांनी मुलांना गाणी, गोष्टी, कार्टून यामध्ये रमवून ठेवले. त्यामुळे मुलांमध्ये हळूहळू शाळेविषयी गोडी निर्माण होऊ लागली. आणि ज्या शाळेची जागा जनावरांनी घेतली होती तेथे तब्बल आठ महिन्यांनंतर वर्ग भरण्यास सुरवात झाली. रणजितसिंह डिसले यांच्या मार्गदर्शनामुळे आता हळूहळू पालकांना शाळेचे महत्त्व पटू लागले होते.


अशांत देशांसाठी पीस आर्मी

जगातील आठ देशांमध्ये अशांतता नांदत असून देशातील शांततेवरच त्या-त्या देशाचा विकास अवलंबून असतो, हे लक्षात घेऊन रणजितसिंह डिसले या साध्या प्राथमिक शिक्षकाने या आठ देशांचा अभ्यास करून तेथील नागरिकांना नेमके काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना एक भयानक पण आश्वासक असे वास्तव लक्षात आले. भारत-पाकिस्तान, इराण-इराक, इस्राईल-पॅलेस्टाईन आणि अमेरिका-उत्तर कोरिया या आठ देशांमध्ये कायम अशांतता व एकमेकांच्या विरोधात माथी भडकाविण्याचे काम संधिसाधू व्यक्ती व गटांकडून होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह डिसले सरांनी "लेट्‌स क्रॉस द बॉर्डर' हा प्रोजेक्‍ट राबविला आहे. याअंतर्गत त्यांनी या आठ देशांतील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांची "पीस आर्मी' तयार केली आहे. या देशांमध्ये ज्या-ज्या वेळी तणाव निर्माण होईल, त्या-त्या वेळी हे विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधून त्या-त्या देशातील जनजीवनाविषयी व सर्वसामान्य लोकांच्या भावनांविषयी जाणून घेतात आणि प्रसारमाध्यमातून येणाऱ्या खोट्या बातम्यांचा पर्दाफाश करतात. अगदी अलीकडेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा करून दोन्ही देशांतील जनभावना जाणून घेतल्या, तेव्हा वास्तव काही वेगळेच आणि प्रसारमाध्यमातून काही वेगळेच जनेतसमोर आणले जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोदवले.


भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे

परदेशातील शिक्षण पद्धती जाणून घेताना भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करता, भारतात प्रचंड लोकसंख्या हा मुख्य अडसर असल्याचे लक्षात येते. यावरही रणजितसिंह डिसले यांनी विचार केलेला आहे. परदेशात 18 ते 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते तर भारतात मात्र हेच प्रमाण प्रतिशिक्षक पन्नास ते साठ विद्यार्थी एवढे असते. यावर उपाय सुचविताना रणजितसिंह डिसले म्हणतात, "भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्याकडे परदेशाप्रमाणे शिक्षक नियुक्ती शक्‍य नाही. पण अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर आपण वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे आपण सहज पूर्ण करू शकतो. पण हे करत असतानाही शिक्षण क्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असले पाहिजे. आपल्याकडील नेत्यांना आणि मंत्र्यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार असता कामा नये. शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असावे. केवळ पाठ्यक्रम पूर्ण करणे एवढेच शिक्षकांचे काम नसून उद्दिष्टे पूर्ण करताना त्याला जे काही प्रयोग अथवा उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे.'


रणजितसिंह डिसले यांचा सातासमुद्रापलीकडे झेंडा

रणजितसिंह डिसले हे परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. मागील नऊ वर्षाच्या काळात तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उपक्रम व असामान्य कार्य यामुळे ते जगभरातील सर्वोत्तम पन्नास इनोव्हेटिव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांची जगभरात ओळख झाली आहे. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ब्रिटिश कौन्सिल, प्लिपग्रीड, प्लिकेर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत ते कार्यरत असून, सध्या "व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप' या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून जगभरातील 87 देशातील 300 हून अधिक शाळांमधील मुलांना शिकवण्याचे काम करतात.


गेल्या नऊ वर्षांच्या सेवेत त्यांना 12 आंतरराष्ट्रीय व 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय बारा शैक्षणिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव करणारी "हिट रिफ्रेश' ही विशेष चित्रफीत प्रकाशित केली असून असा मान मिळालेले ते जगातील एकमेव शिक्षक आहेत. अवघ्या 28 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टची फेलोशिप मिळविणारे सर्वात तरुण प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याशिवाय आज तब्बल 140 देशातील बारा हजार शिक्षकांमधून प्रथम मानांकन मिळवून त्यांना सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत गल्ली ते दिल्ली असा प्रवास सर्वांनीच अनुभवला असेल, पण "गल्ली ते ग्लोबल' असा प्रवास करणारे रणजितसिंह डिसले हे एकमेवाद्वितीय असावेत, यात शंका नाही.


संपादन : श्रीनिवास दुध्याल