🔖  *माझी बातमी ।। व्हाट्सअप मॅगझीन*


💁‍♂️  *महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश - पहा सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा ?*


⏰   राज्यात 2 सप्टेंबर पासून शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आली , मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय खर्चामध्ये कोरोनाचा समावेश नव्हता 


📃  दरम्यान आता १७ डिसेंबरला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश करण्यात आला आहे - याविषयीची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे 


💁‍♂️ *हे आपण व्यवस्थित समजून घेऊ*


🔰  तसे तुम्हला माहिती असेल शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते


🔰  तर याआधी राज्य शासनाने मार्च 2005 मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजार निश्चित केले आहेत - आता या १७ डिसेंबरला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश करण्यात आला आहे 


🔰  काल जाहीर झालेला हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे - आता या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे


📌 *राज्य सरकारने १७ डिसेंबरला* - घेतलेला निर्णय हा खरोखर खूप महत्वाचा आहे , आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा 


🙏  *सहकार्य करा - इतरांना पण शेअर करा*

No comments:

Post a Comment